लोकनेत्या ताईसाहेब....
महाराष्ट्रात तसे अनेक नेते आहेत ज्यात महिलाही आहेत पण पुरुष नेत्यांच्या मानाने राज्याच्या प्रमुख नेत्यांमधे गणल्या जानाऱ्या महिला या बोटावर मोजन्यवढ्याच आहेत. त्यात अग्रस्थानि असणारया नेत्या म्हणजे राज्याच्या ग्रामविकास तसेच महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे या आहेत . सामाजिक कार्य करता करता त्यांच्या ध्यानी मनी नसतानाहि अचानक राजकारणात आलेल्या पंकजा मुंडे या राज्याच्या राजकारणात टिकनार नाहीत असच सर्वाना सुरुवातीला वाटले होते . पण प्रथमतः परळी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेत पोचलेल्या पंकजा यांनी अत्यंत कमी कालावधीत आपल्या कामगिरिद्वारे जनमानसात आपले स्थान बळकट केले वडिलांचा वारसा जरी त्यांच्या पाठीशी असला तरी युवा मोर्चाचा माध्यमातून त्यांनी पवारांच्या बालेकिल्ला असलेल्या बारामतिमधे एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वाची चुनुक दाखवून दिली राज्यातील दिग्गज नेतेही पवारांच्या बालेकील्ल्यात त्यांना आव्हान द्यायला 10 वेळेस विचार करुण देखील कधी साधा कार्यक्रम घेवू शकले नाहीत तिथ त्यांनी एल्गार मेळावा घेतला . लेक वाचवा मोहीम ही यशस्विरित्या राबवून त्यांनी सामाजिक कार्यातही चुनुक दाखवून दिली . लोकसभा निवडणुकीत राज्याची धुरा सांभाळणाऱ्या गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या बिड लोकसभा मतदारसंघाची प्रचाराची धुरा पंकजा यांनी स्वतःच्या खांद्यावर घेवून ती फक्त यशस्वी केलि नाही तर उत्तमरित्या पेलुन दाखवली . लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसातच गोपीनाथ मुंडे यांच निधन झाले आणि सबंध महाराष्ट्रावर काळाने आघात केला , महारष्ट्राचा लोकनेता, शेतकऱ्यांचा कैवारी आणि मुख्यमंत्री हरवला ज्यावेळी स्वतःच्या वडिलांचे छत्र हरवल्यानंतर पंकजा यांना धीर देण्याची गरज असताना अशावेळी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो जनतेला जी सैरभैर झाली होती त्यांना पंकजा यांनी आधार दिला आणि वडिलांचा वारसा पुढे चालु ठेवण्याचा वसा घेतला आणि विधानसभा निवडणुकी आधी संघर्षयात्रा काढून विधानसभा निवडणुकीत मोलाचा वाटा उचलला . मंत्रीपदि विराजमान होताच ज्या जलसंधारण खात्याला कोणी ओळखत नव्हते त्या खात्याला त्यांनी जलसंपदा खात्यापेक्षा जास्त महत्व प्राप्त करुण दिले . जलयुक्त शिवार योजना त्यांनी यशस्वीरित्या राबवली . वैद्यनाथ बँक, वैद्यनाथ साखर कारखाना असे पारंपारिक गडही तगडे विरोधक असताना जिंकले आणि फक्त सहानुभूति नाही तर झुंज देवून त्या निवडणूक जिंकू शकतात हे सिद्ध करुण दाखवले . जीवनात त्यांना बऱ्याच कठिन पायऱ्या चढायच्या आहेत आणि पंकजा मुंडे त्याही यशस्विपणे पार पाड़तील यात शंका नाही आज त्यांचा वाढदिवस त्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा असच त्यांच्या चांगल्या कामाचा आलेख वाढत जावो हीच ईश्वरचरनि प्रार्थना.
|| ताईसाहेबांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ||
- भावार्थ भागवत दौंड (प्रदेश उपाध्यक्ष)
अखिल भारतीय युवा परिषद
No comments:
Post a Comment